जिल्ह्यात आज सकाळी ६६ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही १३१०४ वर गेली आहे.
आज सकाळी पहिल्या टप्प्यात कोरोना रुग्णांच्या अहवालानुसार ६६ रुग्ण वाढले. यामध्ये अँटीजेनद्वारे केलेल्या तपासणीतील ग्रामीण भागातील ४० रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १३१०४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८५३६ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत ४४३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सध्या ४१२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
ग्रामीण भागात ४३ रुग्ण वाढले
ग्रामीण भागात ४३ रुग्ण वाढले आहेत. त्यात संतपूर, कन्नड १, पाचोड १, बजाजनगर १, औरंगाबाद ३, गंगापूर ९, सिल्लोड ६, वैजापूर २१, पैठण १ या भागातील रुग्ण आढळून आले आहेत.
शहरात २३ रुग्ण वाढले
शहरात आणखी २३ रुग्ण वाढले आहेत. त्यात गारखेडा १, चिकलठाणा १, उल्कानगरी १, पडेगाव २, रामनगर १, एसटी कॉलनी २, पंचशीलनगर २, नारेगाव २, किर्ती सोसायटी एन आठ १, ज्ञानेश्वर कॉलनी, गारखेडा १, मुकुंदवाडी ६, जय भवानी नगर २, एन दोन सिडको १ या भागातील रुग्ण आढळून आले आहेत.












